राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांग क्रीडापटू काव्या कदमची चमकदार कामगिरी!
माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केला जिद्द आणि प्रयत्नशीलतेचा सन्मान!
२६ मार्च, पुणे : सोमेश्वरवाडी येथील इयत्ता तिसरीतील दिव्यांग विद्यार्थिनी काव्या कदम यांनी नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. लांब उडी आणि मॅरेथॉन या दोन्ही प्रकारांमध्ये तिने द्वितीय क्रमांक पटकावून आपल्या कठोर परिश्रमाची साक्ष दिली आहे.
या उल्लेखनीय यशानंतर माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी त्यांच्या झुंज या निवासस्थानी तिचा सन्मान करून उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तिच्या क्रीडा क्षेत्रातील यशासाठी कौतुक व्यक्त करताना त्यांनी तिच्या प्रयत्नांची दखल घेतली.
काव्याचे हे यश केवळ खेळातील कौशल्याचे नव्हे तर तिच्या अदम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. दिव्यांगत्वाला मात देऊन तिने स्वतःच्या क्षमतेवर विजय मिळवला आहे. तिची जिद्द आणि प्रयत्नशीलता पाहून ती भविष्यात आणखी मोठे यश मिळविणार आहे, अशी खात्री वाटते.
काव्याच्या या यशामुळे इतर दिव्यांग मुलांमुलींनाही आपल्या स्वप्नांपुढे ठेच खाऊ नका, अशी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या यशाने दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळेल