राज्यभर सत्यजीत तांबे यांच्या ‘या’ उपक्रमाची जोरदार चर्चा; नवमतदारांना मतदानासंदर्भात स्वतः करताहेत मार्गदर्शन !

संगमनेर: (२४ एप्रिल)- सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असून विविध पक्ष, नेतेमंडळी नागरिक यांना निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून जे लोक मतदान करत आहे, त्यांना मतदानाच्या प्रक्रियेविषयी पुरेशी माहिती आहे. पण जे नवीन मतदार आहेत आणि यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहे, त्यांच्या मनात मतदान प्रक्रियेबद्दल संभ्रम, शंका असू शकते. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते? याबद्दल ज्यांना पुरेशी माहिती नाही, अशा नवमतदारांची संख्या काही कोटींच्या घरात आहे.

अनेक तरुण मतदार फक्त मतदान प्रक्रियेविषयी आवश्यक ती माहिती नसल्यामुळे मतदान करत नसल्याची धक्कादायक बाबही नुकतीच समोर आली आहे. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून मतदान करण्याचे महत्व लोकांना समजावून सांगणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे अभ्यासू नेते सत्यजीत तांबे आता युवकांच्या मतदानाविषयी असलेल्या शंका दूर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एक भन्नाट उपक्रम राबवत असून युवकांशी संवाद साधत त्यांना असलेल्या अडचणी दूर करणार आहेत. याबाबत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश देखील दिला आहे.

ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. ज्या नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेविषयी शंका आहेत, त्यांनी 7997006963 या नंबरवर मिस्डकॉल देऊन एक गुगल फॉर्म भरायचा आहे. ज्यात त्यांना त्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. तरुणांच्या या सर्व प्रश्नांना स्वतः सत्यजीत तांबे मार्गदर्शन उत्तरे देणार आहेत. व्हिडिओत त्यांनी भरत देशातील लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशातील लोकशाही आणि तेथील निवडणूक प्रक्रियेत नेमका काय फरक आहे यावर देखील थोडक्यात प्रकाश टाकला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.