या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

या विमातळाचा इतिहास मोठा, एकट्या दुकट्यानं काही होत नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग |  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिपी विमानतळाचं अखेर सर्वांसाठी खुला होत आहे. या विमानतळाच्या उद्धाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय मंत्री नारायण राणे, पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे , खासदार विनायक राऊत रामदास आठवले सुभाष देसाई  आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ( हेदेखील उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त करत या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं म्हटलं.

“या विमातळाचा इतिहास मोठा आहे. एकट्या दुकट्यानं काही होत नाही. कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. कोकणाचं सौदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. सध्या चिपी विमानतळाचा अडीच किमीचा रन वे आहे. आम्ही येताना पाहत होतो आणि चर्चाही केली. याच्या बाजूला मोकळी जागाही आहे. हा रन वे साडेतीन किमीचा होऊ शकतो,” असं पवार यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतल्याचंही सांगितलं. तसंच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही गडकरींचीही भेट मागितली असल्याची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.