यंदाची ‘पुणे आयडॉल’ स्पर्धा २७,२८,२९ मे व २ जून दरम्यान होणार
मा. नगरसेवक सनी निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन कडून नावनोंदणीचे आवाहन !
पुणे- पुणेकरांच्या मनात गेल्या २२ वर्षापासून घर करून बसलेली स्पर्धा म्हणजे माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांनी २००२ साली सुरु केलेली’पुणे आयडॉल’ होय. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गायक, कलाकार घडले आहेत. सर्वसामान्य पुणेकरांच्या गायनाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न या स्पर्धेने केला आहे. उद्योजक व मा. नगरसेवक सनी निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली व सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यामतून देखील २७,२८,२९ मे व २ जून दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
यंदा ही स्पर्धा २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २००२ साली स्व.विनायक निम्हण यांही सुरु केलेल्या स्पर्धेची सुरुवात केली. पाहता पाहता पुणेकरांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गायनाला संधी देत अनेक गायकांना मोठी संधी मिळाली आहे. अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये गायनाची संधी मिळाली आहे. अनेकांनी या माध्यमातून मोठे नाव कमावले आहे. पुणे आयडॉल २०२३ ची विजेती ठरलेली अंध कलाकार श्रेया गाढवे हिचे नुकतेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावरूनच पुणे आयडॉलचे महत्व अधोरेखित होते. गायकांना कलेतील मोठ्या व्यासपीठांकडे घेऊन जाणारे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल याची प्रचिती पुन्हा एकदा पुणेकरांना आली आहे.
स्व. आबांच्या पश्चात मागील वर्षी प्रथमच झालेली स्पर्धा सनी दादा निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यांनी देखील स्व. विनायक निम्हण यांच्या प्रमाणेच स्पर्धेचे सुंदर असेल नियोजन केले होते. या माध्यमातून ते आल्या वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. पुणे शहरात अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन स्व. आबांनी कायम केले. सामाजिक सेवेचा तोच वसा सनी निम्हण पुढे घेऊन जात आहेत. व आपल्या वडिलांनी लावलेले रोपटे मोठे करण्याचे काम करत आहेत. भविष्यात यातून नक्कीच अनेक गायक घडतील हा विश्वास आहे.
पुणे आयडॉल स्पर्धा कशी होणार !
या स्पर्धेच्या प्राथमिक व उपांत्य फेरीचे सामने २७,२८,२९ मे दरम्यान औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृह येथे सकाळी १० ते सायं.६ वाजेपर्यंत होणार आहेत, तर स्पर्धेची महाअंतिम फेरी २ जून रोजी जंगली महाराज रोड वरील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायं. ४ वाजता सुरु होणार आहे.
यंदा होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक गायकांनी १५ ते २५ मे दरम्यान
http://sunnynimhan.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा किंवा सोमेश्वर फाउंडेशन, ४४६, गोपी भवन, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर गावठाण, पुणे – ५ येथील कार्यालयाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी 8308123555 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मा. नगरसेवक सनी निम्हण व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.