माळशिरस तालुक्यात संघटन मजबुतीसह, विकास व जनसेवेचा संकल्प

मतदारसंघातील विविध शाखांचे उद्घाटनप्रसंगी पक्ष संघटनेला नवी दिशा देणार, मा. आ. राम सातपुतेंचे सुतोवाच

भाजपा संघटन पर्वाच्या निमित्ताने अकलूज शहरासह माळशिरस तालुक्यातील धानोरे, मेडदसह विविध भागांमध्ये पक्ष संघटनेला नवी दिशा देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मतदार संघातील विविध शाखांचे उद्घाटन मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आपल्या संकल्पांची मांडणी केली.

शहर आणि तालुका पातळीवरील शाखा पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि जनतेशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पार पाडणार आहेत. विकास व जनसेवेसाठी या शाखा नवी दिशा देण्याचे साधन ठरतील. तसेच पक्ष संघटना केवळ राजकीय विचारांचा प्रचार करणारे माध्यम नाही, तर जनतेच्या समस्या सोडवण्याचा आणि त्यांच्या हितासाठी झटण्याचा कणा आहे, असे सुतोवाच त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. अकलूज, मेडदसह धानोरे आणि इतर शहरांमध्येही संघटना मजबूत करत त्याला मूळ स्वरूपात आणण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण, विविध विकास प्रकल्पांची अंमलबजावणी आणि जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी पक्ष कार्यकर्ते अधिक सक्षमपणे कार्य करतील, अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

भाजपाच्या संघटन पर्वातून उभ्या राहणाऱ्या या शाखा जनतेच्या विश्वासाला नवा बळकटी देणार आहेत. माळशिरस तालुक्यातील विविध ठिकाणी पक्षाचे संघटन अधिक बळकट करून संपूर्ण माळशिरस तालुका विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा त्यांचा निर्धार प्रत्यक्षात उतरेल का नाही याविषयात सम-समांतर मते असून अगदी काही दिवसांवर आलेल्आया गामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत यावर प्रकाश पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.