महाराष्ट्रातील पहिला आमदार ज्याने हिवाळी अधिवेशनासाठी जनतेकडून मागवले प्रश्न!

नागपूर येथे आता लवकरच हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात सर्वच आमदार मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी तयारी करत असतात. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यानुसार अनेक लोकप्रतिनिधी त्यावर ऍक्टिव्ह सुद्धा असतात. असेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे हे सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात. परंतु ते नेहमीच जनतेसोबत संवाद ठेवण्यासाठी नानाविध उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून राबवत असतात. मागे त्यांनी आमदार म्हणून 100 केलेल्या कामाचा लेखाजोखा सोशल मीडियावर मांडला आणि लोकांकडून प्रश्नांची उत्तरे मागवत मूल्यमापन सुद्धा केले आणि तो निकाल पुन्हा लोकांसमोर मांडला! हा उपक्रम राबवणारे ते देशातील पहिले आमदार होते. असाच सर्वे त्यांनी पुन्हा 200 दिवस पूर्ण झाल्यावर सुद्धा केला होता.

आता सत्यजीत तांबे यांनी आणखी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात लोकांच्या अपेक्षा काय आहेत, कोणते प्रश्न अधिवेशनात मांडायला हवे याची विचारणा त्यांनी लोकांना थेट सोशल मीडियावरून केली आहे. या भन्नाट कल्पनेसंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले ” आमदार म्हणून मी जनतेचं काम करतो, त्याचं देणं लागतो. त्यांनी मतदानरूपी आशीर्वाद दिले, म्हणूनच मी आमदार झालो. मी स्वतः प्रश्नावली तयार केली आहे, परंतु शेवटच्या घटकांचे प्रश्न नजरकैदेने सुटू नये म्हणून मी लोकांकडून त्यांच्या अपेक्षा विचारत आहे. जेणेकरून मला त्यांच्या प्रश्नांना न्याय देताना खारीचा वाटा उचलता येईल व त्यांच्या ऋणात राहता येईल”

Leave A Reply

Your email address will not be published.