महाराष्ट्राच्या गायन प्रतिभेचा महोत्सव “पुणे आयडॉल २०२५”चे उद्घाटन १९ मे रोजी

सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून गुणी कलाकारांना व्यासपीठ; सुमारे दोन दशकांची परंपरा लाभलेली स्पर्धा पुण्यात रंगणार!

पुणे, १६ मे : पुण्यातील सांगीतिक क्षेत्रातील मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी “पुणे आयडॉल” ही गायन स्पर्धा याही वर्षी पारंपरिक उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने गेली तब्बल दोन दशके ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील गुणी गायकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरत आहे.

या वर्षीचा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनरकर, राष्ट्रपती पदक विजेती गायिका सावनी रवींद्र हे उपस्थित असणार आहेत. यावेळी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने केले आहे.

या स्पर्धेतून अनेक नवोदित गायकांना संधी मिळून त्यांनी पुढे संगीताच्या व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवले आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक बहारदार सांगीतिक मेजवानी ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने प्रतिभावंत गायकांच्या सुरेल आवाजात रंगणारी ही सायंकाळ पुणेकरांना नक्कीच मंत्रमुग्ध करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.