मंत्री Jaykumar Gore यांच्याकडे जिल्हा परिषदेतील Education Departmentच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्याची Satyajeet Tambe यांची मागणी
कर्मचाऱ्यांची QR बेस उपस्थिती, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया, प्रा. शाळेला पदवीधर व ग्रेड मुख्याध्यापक पद निर्माण करणे यांसारखे शिक्षण विभागाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्य्साठी आ. तांबे आग्रही
प्रतिनिधी,
राज्यातील प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही जिल्हा परिषदांमार्फत घेतली जाते. मात्र सध्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तातडीने बैठक घ्यावी व प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन केली.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची QR बेस उपस्थिती नसल्यास त्यांचे वेतन रोखण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरीत राबविण्यात यावी. यांसारख्या जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करून त्या समस्यांचे तातडीने निराकरणासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले असून सर्व प्रश्नांसाठी एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.
शंभर पटसंख्या असणाऱ्या प्राथमिक शाळेला पदवीधर व ग्रेड मुख्याध्यापक पद निर्माण करणे तसेच मुख्यालयाची अट 30 कि. मी. पर्यंत मर्यादित शिथिल करण्यात यावी आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या शिक्षकांना 10-20-30 वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी. त्याचबरोबर शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यात यावी आणि उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी सन 1967 जी. आर. मध्ये बदल करून त्यांना पदोन्नतीच्या संधी निर्माण करण्याची मागणी आ. तांबेंनी केली आहे.
आ. सत्यजीत तांबे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत अशी मागणी आ. तांबेंची आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम आ. तांबे करत आहेत. राज्याच्या प्रत्यके अधिवेशनात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या उपस्थित करून त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.