“तरुणांसाठी नाशिकमध्ये सुरु होणार ‘युनोव्हेशन सेंटर”, या आमदारांनी केली घोषणा!

सुदृढ समाजनिर्मितीचे ध्येय घेऊन काम करणारी जयहिंद लोकचळवळ सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी वाटचाल करत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे या संघटनेचे संघटक आहेत. राज्यभरातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाची काळजी वाहणारे आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून नाशिकमधील सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे युनोव्हेशन सेंटर उभं राहत आहे. नाशिक जिल्ह्यातील हे पहिले युनोव्हेशन सेंटर आहे.

आजचा युवा वर्ग आपल्या देशाची खरी ताकद आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या युनोव्हेशन सेंटर उभारणीच्या संकल्पनेला राज्य सरकारने जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी पावणेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आणि आता नाशिक जिल्ह्यातही हे सेंटर उभारले जाणार आहे. युनोव्हेशन सेंटरमध्ये युवकांना एकाच छताखाली शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांची माहिती मिळेल अथवा त्याबाबत चर्चा करता येईल. तसेच तरुणांसाठी हे केंद्र एकत्र येण्यासाठीचं हक्काचं व्यासपीठ ठरेल, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले आहे. जयहिंद लोकचळवळ या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांत युनोव्हेशन सेंटर उभारले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.