डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं संपूर्ण आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित – मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.१४ एप्रिल :– महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल संपूर्ण आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केल. त्याचं मोठपण हे अख्या जगाने मान्य केल आहे. त्यामुळे त्यांच्या अमुल्य उपदेशाचे पालन आपण सर्वांनी करायला हवे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध मंडळांना भेटी देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर अशोक दिवे, विनायक पांडे, भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न, रंजन ठाकरे, प्रशांत जाधव, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, आनंद सोनवणे, समाधान जेजुरकर, संजय साबळे, विलास शिंदे, कविताताई कर्डक, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, संजय खैरनार, योगेश निसाळ, पूजा आहेर, नितीन चंद्रमोरे, आशा भांदुरे, पुष्पा राठोड, मेघा दराडे, मनीषा काकळीज, निलिमा सोनवणे, निर्मला सावंत, रोहिणी रोकडे, नाना पवार, बॉबी काळे, दिलीप साळवे, शरद काळे, उमेश सोनवणे, भगवान दोंदे, दिपा कमोद, मकरंद सोमवंशी,अमोल नाईक, बाळासाहेब गीते, जीवन रायते, बाळासाहेब पाठक, मुख्तार शेख, सागर मोटकरी, चिन्मय गाढे, संदीप दोंदे, संतोष भुजबळ, सोमनाथ गायकवाड, रवि पगारे, साहेबराव पवार, सोमनाथ गायकवाड, भीमराव शिंदे, डॉ. बलराज आहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठपण संपूर्ण जगाने मान्य केल आहे. जगात अनेक धर्मांतर शस्त्राचा धाक दाखवून आणि रक्तपात करून झाले आहे. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्त्ताचा एक थेंब न सांडविता लाखो लोकांचे एकाचवेळी धर्मांतर केले. त्यांनी केलेलं हे धर्मांतर जगातील एकमेव असे उदाहरण आहे. त्यांनी देशातील गरीबातील गरीब आणि श्रीमंत यांच्यात कुठलाही भेद न ठेवता सर्वांना मतांचा अधिकार प्राप्त करून दिला. त्यांनी दिलेला हा अधिकाराचा मतदानासाठी उपयोग करावा आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा योग्य वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले कि, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. तसेच भारतीय लोकशाहीतील सर्वात प्रभावशाही व्यक्तिमत्त्व आहे. डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा अतिशय महत्वाचा उपदेश दिला आहे. या उपदेशाचे पालन करून तो अंगीकारावा असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले कि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना गुरु मानले होते. त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांत आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने दीन, दलित, श्रमिक, विस्थापित आणि शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्येही त्यांनी योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी असून ते तरुणपिढीला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शहरातील या मंडळांना भेटी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी यंग सम्राट बहुउद्देशीय संस्था पाथर्डी फाटा, मातोश्री सोशल फाउंडेशन स्टेट बँक चौक,सिडको, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीराव फुले,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती मंडळ शालीमार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळ पंचवटी कारंजा, युनायटेड महिला सोशल फाउंडेशन, हाजी दरबार यांना मंडळांना भेटी देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. तसेच मोठा राजवाडा,चौक मंडई येथे जयंती निमित्त आयोजित मिरवणुकीचा शुभारंभ करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बुद्ध स्मारक,त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बोधीवृक्षास अभिवादन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुद्ध स्मारक,त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व येथे लावण्यात आलेल्या बोधीवृक्षास पुष्पअर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी भिक्खू सुगत थेरो, भिक्खू संघरत्न यांच्यासह पदाधिकारी व अनुयायी उपस्थित होते.