औंधमध्ये सनी निम्हण यांचा लोकाभिमुख संवाद; ‘Solve With Sunny’ अभियानातून विकासाचा स्पष्ट रोडमॅप
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औंध भागातील सिद्धार्थ नगर सोसायटी येथे भाजपा नेते सनी निम्हण यांनी नागरिकांसोबत सविस्तर संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांच्या भावना, त्यांच्या दैनंदिन समस्या आणि अपेक्षा जाणून घेत प्रभागाच्या विकासाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
“आपल्या प्रभागात नेमका कोणता बदल हवा आहे, विकासाचा मार्ग कसा असावा” यावर नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली. सनी निम्हण यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत लोकसहभागातून विकास साधण्याचा आपला ठाम निर्धार व्यक्त केला.
यावेळी सनी निम्हण यांनी स्पष्ट केले की, हा जाहीरनामा Policy, Planning आणि Public Participation अशा ‘P3’ संकल्पनेवर आधारित आहे. याच संकल्पनेतून ‘Solve With Sunny’ हे अभियान सुरू करण्यात आले असून, नागरिकांच्या थेट सहभागातून समस्या ओळखून त्यावर ठोस व शाश्वत उपाय राबवण्यावर भर दिला जात आहे.
औंध–बोपोडी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. लोकांच्या प्रश्नांना थेट भिडणारा, संवादातून उपाय शोधणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात औंध–बोपोडी प्रभागाच्या विकासासाठी आपण नेहमीच तत्पर राहू, असा विश्वास सनी निम्हण यांनी यावेळी व्यक्त केला. लोकांशी थेट संपर्क, स्पष्ट भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सनी निम्हण यांचे नेतृत्व औंधमध्ये अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे.