औंध–बोपोडीच्या विकासासाठी सनी निम्हण यांचा जनतेशी थेट संवाद
औंध रोड परिसरातील पाटील पडळ, चंद्रमणी संघ, कांबळे वस्ती व बारहाते वस्ती या भागात सनी विनायक निम्हण यांनी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान Solve With Sunny या अभिनव उपक्रमाची माहिती देत, औंध–बोपोडी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा सनी निम्हण यांचा प्रयत्न यावेळी विशेषत्वाने दिसून आला. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वातून प्रेरणा घेत, नागरिकांच्या मनातील विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
प्रभागाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक, पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा विश्वास सनी निम्हण यांनी नागरिकांना दिला. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे औंध–बोपोडीतील नागरिकांमध्ये विकासाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या असून, सनी निम्हण यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.