एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनीला माजी मंत्र्यांनी दिली लिफ्ट…
पुरंदर | माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या गाडीला शाळेतील मुलींनी हात केला, हे पाहून शिवतारे यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितले व या विद्यार्थिनींना शाळेपर्यंत सोडले.
माजी मंत्री विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील गराडे येथून सासवडला निघाले होते. वाटेत त्यांची गाडी वारवडी फाट्यावर आली तेव्हा शाळेला निघालेल्या विद्यार्थिनी त्याठिकाणी एसटीची वाट पाहत उभ्या होत्या, त्यातच त्यांनी समोरून येणाऱ्या शिवतारे यांच्या गाडीला हात केला व गाडी थांबवली. या गाडीत माजी मंत्री विजय शिवतारे होते. यावेळी त्यांनी मुलींना कोणत्या वर्गात शिकता? यासह अभ्यासाची देखील चौकशी केली.
शिवतारे यांनी फेसबुक पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे.
“आज गराडे येथून सासवडला येत असताना वारवडी फाट्यावर एसटीची वाट पाहत असलेल्या इयत्ता ९ वी तील मुलींनी शाळेत जाण्यासाठी माझ्या गाडीला हात केला. त्यांना शाळेच्या गेटवर सोडले.”असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.