आजचा बंद म्हणजे राज्य सरकार पुरस्कृत दहशतवादच – देवेंद्र फडणवीस

सरकारने बांधावर केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. आजचा महाराष्ट्र बंद हा उत्तर प्रदेशातील घटनेला संवेदना दाखविण्यासाठी नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी संकुचित विचाराने केलेला बंद आहे. लोकांचा बंदला पाठींबा नाही. पोलिस प्रशासन आणि दमदाटी करून लोकांना बंद करायला प्रवृत्त केलंय जातयं. खऱ्या अर्थानं हे बंद सरकार आहे. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. एकूणच सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्यासारखा हा बंद आहे, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राजस्थानातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या लाठी हल्ल्यावर हे गप्प बसलेत. पण उत्तर प्रदेशातील घटनेवर महाराष्ट्र बंद केला जात आहे. हा राज्य सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारला थोडीशी जरी लाज असेल तर त्यांनी पूरग्रस्तांना मदत करावी. हे ढोंगी सरकार असून शेतकऱ्यांसोबत नाही असंही फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते फक्त माध्यमांसमोर बोलणारे आहेत. त्यांना वास्तव, जमिनीवरचं काही माहिती नाही. मराठवाड्यात एकही नेता गेला नाही असेही फडणवीस यांनी म्हटलं. तसंच बेस्टच्या बसेस फोडण्यात आल्या. महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने ठरवून हे केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच बंद करण्याला न्यायालयाकडून बंदी असतानाही असं केलं जात असून हा न्यायालयाचा अवमान आहे. यासाठी आधी शिवसेनेला दंडही झाला असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

हे सरकार वसुली सरकार आहे. तथापि आमची मागणी आहे की, आज जी तोडफोड करण्यात आली त्याची नुकसान भरपाई सरकारकडून घेतली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यापेक्षा ते बिघडविण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जातो. देशाच्या इतिहासात मंत्रिमंडळ बैठकीत इतका दुरुपयोग कोणीच केला नाही. या बंदचा आम्ही निषेध करतो. येथे शेतकऱ्यांसोबत झालेली घटना ही खऱ्या अर्थाने जालियनवाला बाग हत्याकांड आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.