अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर ‘दिनदर्शिका २०२४’ चे युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या हस्ते प्रकाशन !

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर ‘दिनदर्शिका २०२४’ चे उद्घाटन पुणे शहरातील युवा उद्योजक सनी निम्हण यांच्या हस्ते संपन्न झाले.

या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे व्यवसायिक कोर्सेसचे बारकोड छापलेले आहेत. या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे व्यवसायिक कोर्सेसचे बारकोड छापलेले आहेत. संघटनेचे वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचे फोटो, पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायांच्या जाहिराती छापलेल्या आहेत. तसेच संघटनेच्या उपक्रमांसह नागरिकांना उपयुक्त अशी वैविध्यपूर्ण माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे.

यावेळी युवा उद्योजक सनी निम्हण यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर ‘दिनदर्शिका २०२४’ ही दिनदर्शिका नक्कीच नागरिकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास बोलताना व्यक्त केला.

युवा उद्योजक सनी निम्हण यांनी पुणे शहराच्या गौरवात भर घालणारे ‘सनीज् वर्ल्ड’ नावाने आपले विश्व उभारले आहे. त्यामाध्यमातून त्यांनी पुणे शहरातील हजारो युवक- युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. स्व. विनायक आबा निम्हण यांच्या नंतर सनी निम्हण यांच्या खांद्यावर आलेली व्यवसायाची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. याशिवाय उद्योग व्यवसायासोबतच पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सर्वसामान्य नागरिकांन सेवा देताना दिसत आहेत.

यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले, राकेश गायकवाड, गणेश ठाकर, अनिकेत भगत, संजय काळे, सचिन वडघुले, उमेश वाघ, तुषार भिसे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.