काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सुपर एक हजार युवा जोडो अभियान – सत्यजीत तांबे
मुंबई | विधानसभा, ग्रामपंचायत आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राबविलेल्या सुपर ६० अभियानाला मिळालेल्या यशानंतर तांबे यांनी आता सुपर १००० या अभियानाची घोषणा केली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील १००० कार्यकर्त्यांना सोशल मीडिया व्यवस्थापन, बूथ नियोजन व व्यवस्थापन, वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व विकास आणि माध्यमे व्यवस्थापन याचे इच्छुकांना तज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
सुपर १००० मध्ये जोडल्या गेलेल्या युवक व युवतींना येऊ घातलेल्या निवडणुकांत संधी दिली जाईल आणि त्यातूनच विधानसभा – लोकसभा निवडणुकीचे चेहरे निर्माण करून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणायची आहे, असा संकल्प तांबे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात व्यक्त केला आहे.
खासदार राहुलजी गांधी यांनी २०१० सालापासून NSUI आणि युवक काँग्रेसच्या नेमणुका पक्षांतर्गत निवडणुकामधून करण्यास सुरूवात केली. सामान्य घरातील युवकांना पक्षसंघटनेतून आपली चुणूक-क्षमता दाखवण्याची संधी मिळावी आणि पक्षांतर्गत लोकशाही अजून वृद्धिंगत व्हावी हा त्यामागचा उद्देश होता, असे मत यावेळी तांबे यांनी मांडले. या उपक्रमातून एकंदरीत तांबे आणि युवक काँग्रेसने निवडणुकांची पायाभरणी केली आहे.