रिद्धिमान साहा ला पत्रकाराने दिली धमकी; बीसीसीआय करणार चौकशी

भारतीय क्रिकेट टीम मधील यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला पत्रकाराने धमकावल्या प्रकरणाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चौकशी करणार आहे. खरं तर, साहाने एका पत्रकाराशी व्हॉट्सअ‍ॅपवर केलेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पत्रकाराने मुलाखत देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. त्याचबरोबर टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. साहाने शेअर केलेल्या स्क्रीन शॉटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही मला मुलाखत द्या. हे चांगले होईल. जर तुम्हाला लोकशाही पद्धतीने मुलाखत द्यायची असेल तर मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. संघ व्यवस्थापनाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षकाची निवड केली आहे, जे मला चांगले वाटते. माझ्या मते सर्वोत्कृष्ट नसलेले 11 पत्रकारही तुम्ही निवडले. जे सर्वात जास्त मदत करू शकतात त्यांना निवडा.

यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकाराने त्यांना व्हॉट्सअॅपवरच फोन केला. साहा यांचा फोन न आल्याने पत्रकाराने रात्री उशिरा मेसेजमध्ये लिहिले की, ‘तुम्ही फोन केला नाही. मी यापुढे तुमची मुलाखत घेणार नाही. मी असा अपमान सहन करू शकत नाही आणि हे मी लक्षात ठेवेन. तुम्ही असं करायला नको होतं. ‘टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, साहा अजूनही बीसीसीआयचा कंत्राटी खेळाडू आहे. अशा स्थितीत त्याच्या आरोपांना गांभीर्याने घेत बीसीसीआयने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर खेळाडूंसोबतही असा प्रकार घडला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साहाचे समर्थन करत चौकशीची मागणी केली होती. शास्त्री यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, एका खेळाडूला पत्रकाराकडून धमकावले जात आहे हे धक्कादायक आहे. हा त्याच्या पदाचा दुरुपयोग होता. टीम इंडियासोबत हे सातत्याने घडत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, असे ते म्हणाले

Leave A Reply

Your email address will not be published.