नागपूर विधान परिषद | चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय
नागपूर | नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. (Nagpur MLC election result) नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते तर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. (BJP Chandrashekhar Bavankule wins Nagpur MLC election) विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना तब्बल 176 मतांनी विजय मिळवला आहे.
निवडणुकीच्या आधी मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला असल्याचं बोललं जात आहे. एकूण मतांपैकी 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांची आवश्यकता होती. यात पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली आहेत.