रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं.चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा कायम आहे.वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती.त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.प्रदर्शनाच्या दोन आठवड्यांमध्ये ‘वेड’ने ४० कोटींचा टप्पा पार केला आहे.हा चित्रपट बनवण्यासाठीही कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला.चित्रपटाचा बजेट १५ कोटी रुपये इतपत होता असं बोललं जात आहे.म्हणजेच १५ कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.