चक्क 11 वेळा घेतली कोविडची लस; बिहार मधील घटना आरोग्य विभागाचे दणाणले धाबे

चक्क 11 वेळा घेतली कोविडची लस घेतली; बिहार मधील घटना आरोग्य विभागाचे दणाणले धाबे

बिहारमधील मधेपुरा (बिहार) मधील एका व्यक्तीने सलग 11 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाची लस घेतली आहे. ही माहिती समोर येताच आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण चौसा ब्लॉकमधील ओरई गावचे आहे. मधेपुरा जिल्ह्यातील उदकिशनगंज उपविभागा अंतर्गत पुरैनी पोलिस स्टेशनच्या ओराई गावात राहणारे ब्रह्मदेव मंडल (84 वर्षे), यांनी दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत कोरोना लसीचे 11 डोस घेतले आहेत. इतकंच नाही तर त्यांना लसीचा खूप फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा लस घेत आहे. आदल्या दिवशी ते चौसा पीएससी येथे लस घेण्यासाठी आले होते, मात्र तेथे लसीकरणाचे काम बंद असल्याने त्यांना 12 वा डोस घेता आला नाही.

आधारकार्डवर ब्रह्मदेव मंडल यांचे वय ८४ वर्षे आहे. त्यांनी टपाल खात्यातही काम केले आहे. सध्या ते निवृत्तीनंतर गावी राहतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना त्यांची पहिली कोरोना लस 13 फेब्रुवारी रोजी पीएससीमध्ये दिली गेली. 13 फेब्रुवारी ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत त्यांनी लसीचे 11 डोस घेतले आहेत. 13 फेब्रुवारी रोजी त्यांना पहिला डोस आणि दुसरा डोस 13 मार्च रोजी जुन्या पीएचसीमध्येच देण्यात आला, तिसरा डोस 19 मे रोजी औराई उप आरोग्य केंद्रात, चौथा 16 जून रोजी भूपेंद्र भगत यांच्या कोटा कॅम्पमध्ये, पाचवी 24 जुलै रोजी जुनी बडी हॉट स्कूल येथे, सहावा 31 ऑगस्ट रोजी नाथबाबा स्थान शिबिरात, सातवा डोस 11 सप्टेंबर रोजी बडी हॉट स्कूलमध्ये, आठवा सुई 22 सप्टेंबर रोजी बडी हॉट शाळेतच, 24 सप्टेंबर रोजी त्यांनी आरोग्य उपकेंद्र कलासन येथे 9 व्यांदा, खगरिया जिल्ह्यातील पर्वता येथे 10वा आणि भागलपूरमधील कहलगाव येथे 11वेळा डोस घेतला.

आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, लोक ऑफलाइन शिबिरांमध्ये असे प्रकार करू शकतात. कारण शिबिरात त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक घेतला जातो, जो नंतर संगणकात टाकला जातो, जो जुळल्यास नाकारला जातो. त्यामुळे, काहीवेळा फीड डेटा आणि वॅक्सिन सेंटरमधील रजिस्टरच्या डेटामध्ये फरक असतो. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागही हतबल झाला आहे. अमरेंद्र प्रताप शाही या प्रकरणाचा तपास करणार असून त्यांनी तात्काळ पुरैनी आणि चौसा पीएचसीच्या प्रभारींकडून अहवाल मागवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.