मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर वर आणणार स्वतःची नाणी?
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर वर आणणार स्वतःची नाणी?
एक लोकप्रिय माध्यम म्हणजे ट्विटर(Twitter). प्रत्येकजण ट्विटर वापरत असतो. आपली मते किंवा कोणी काही पोस्ट केले असल्यास त्यावर आपल्या कमेंट मांडत असतो. तसेच याच ट्विटरवरती एक मायक्रोब्लॉगिंग साईट क्रिएटर्सना या प्लॅटफॉर्मवर पैसे कमावण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने स्वतःची नाणी लाँच करण्याची योजना आणणार आहे असे अहवालात सूचित करण्यात आले आहे.
अॅपचे संशोधन करणाऱ्या जेन मंचून वोंग आणि निमा ओवजी या दोन संशोधकांनी हे फीचर्स पहिले आणि त्यांनी ट्विटरवर शेअर केले. या दोन संशोधकांनी पोस्ट केलेल्या स्क्रिनशॉट बघता ही नाणी युजर्सना चांगला कंटेंट पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन देतील. तसेच युजरनी न वापरलेली नाणी म्हणजेच ते चलन शिल्लक ठेवण्यात येतात असे ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. निमा ओवजी म्हणाले की, हे चलन क्रिएटर्सना पाठिंबा देण्यासाठी असल्याचे यात दिसत आहे. मला यात cyrpto’ शी संबंधित असे काहीही आढळून आले नाही.
एक मायक्रोब्लॉगिंग साईट या नाण्यांवर काम करत होती. मात्र हे फिचर टसुरु होणार की नाही हे ट्विटरकडून सांगण्यात आलेले नाही असे निमा ओवजी यांनी सांगितले. एलन मस्क खर्च कमी करता येतील यासाठी प्रयत्न करत असून ट्विटर इंक. च्या सिंगापूरच्या ऑफिसमधील कामगारांना तेथील परिसर व डेस्क सोडण्यास सांगण्यात आल्याचे त्या परिस्थितीची माहिती असणाऱ्या लोकांनी सांगितले.
कॅपिटाग्रीन ही बिल्डिंग रिकामी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ आहे असे ट्विटरने ईमेलद्वारे सांगितले. सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत ट्विटरच्या इंटर्नल सिस्टीममध्ये नियुक्त करण्यात आले आहे असे एका व्यक्तीने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. ट्विटरचे सिंगापूरमधील ऑफिस हे आशिया-पॅसिफिकचे चे मध्यवर्ती मुख्यालाय आहे. एलन मस्क यांनी सॅन फ्रान्सिकोशी आधारित असणारी कंपनी ताब्यात घेतल्यावर सर्वात जास्त नोकऱ्यांची कपात झालेला हा भाग आहे.