सिंहावलोकनाची वेळ; घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा! – खा.अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार व प्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांची आजची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी आपण गेल्या काळात घेतलेल्या निर्णय सिंहावलोकन करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आहे. शारीरिक थकवा आरामाने जाईल व पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन चिंतन करण्याची गरज आहे. आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारही करणार असल्याचं कोल्हे यांनी या पोस्ट मध्ये म्हटलं. त्यामुळेच चर्चेला उधाण आल्याचं दिसून येतं.

खासदार अमोल कोल्हे यांनी ही फेसबुक पोस्ट रविवारी (7 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजून 16 मिनिटांनी लिहिली. यामध्ये ते म्हणतात, “सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय…थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!

Leave A Reply

Your email address will not be published.