आई वारली, पण तरीही या आमदाराने जनता दरबार भरवला होता! दंतकथा वाटेल अशी खरी गोष्ट !
आई या दोन शब्दांनी सारं विश्व व्यापल आहे. कितीही टेंशन असलं तरीही आईच्या कुशीवर डोकं ठेवून निघलं की समाधान मिळतं! आई व मुलाचं नातं हे असंच असतं, पण जेव्हा आईच आयुष्यातून निघून जाते, तेव्हा?
पण म्हणतात ना माणूस गेला तरी संस्कार जिवंत राहतात. एका अशाच ध्येयवेड्या लोकनायकाने आपल आईच्या मायेचं छत्र गमावल! पण हे दुःख बाजूला सारून त्याने नेहमीप्रमाणे भरणारा जनता दरबार पुन्हा आयोजित केला. आपल्या दुखामुळे गोरगरीब सर्व सामान्य जनतेची कामे अडली जाऊ नये, हा उदात्त हेतू त्यामागे होता. काय म्हणायचं या लोकसेवेच्या तळमळीला!
आईचं गेल्याचं कारण पुढे करून या आमदाराला मस्त महिनाभर पुण्या मुंबईत AC ची हवा खात आराम करता आला असता, पण आपल्या आईने जे संस्कार केले, आपल्या ज्या संघर्षातून मोठे झालो ते विसरून कसं जमेल ना!
माणसं उगाच मोठी होत नसतात, ती आपल्या कामातून मोठी होत असतात. असं संवेदनशील नेतृत्व माळशिरस विधानसभा मतदारसंघाला लाभलं, हे त्या मायबाप जनतेच भाग्यच म्हणावं लागेल! तुम्हाला ही दंतकथा वाटत असली तरी ही खरी कथा आहे आ. राम सातपुते यांची! आई जावून १० दिवस सुद्धा झाले नव्हते, पण या माणसाने भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले! अशा कर्तव्यदक्ष नेत्याला जन्म देणाऱ्या माऊलीला सलाम आहे.