ठाणे सिटी एफसी व इंग्लिश प्रिमिअर लीगचा साउथॅम्प्टन क्लब यांच्यात करार
इंग्लिश क्लबची भारतातील पहिलीच भागीदारी
अंतर्गत माहितीची देवाणघेवाण, प्रशिक्षक व खेळाडू प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार
इंग्लिश क्लबची भारतातील ही पहिलीच भागीदारी आहे.
साउथॅम्प्टन एफसीने घोषणा केली आहे की त्यांनी ठाणे सिटी एफसी सोबत त्यांच्या इंटरनॅशनल अकादमी पार्टनर्सच्या पोर्टफोलिओमध्ये हातमिळवणी केली आहे. या क्लबने ठाणे एफसी सोबत करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामध्ये साउथॅम्प्टन एफसीचा फुटबॉल संघ पुढील तीन वर्षांत ठाणे शहरात फुटबॉल विकासाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देईल.
महत्त्वाकांक्षी फुटबॉलपटूंना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचविण्यास मदत करून त्यांना सक्षम करणार व फुटबॉलसाठी आव्हान देणारे, प्रेरणा देणारे आणि प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करणे हे ठाणे एफसीचे उद्दिष्ट आहे.
मार्क अब्राहम्स, व्यवसाय आणि संघ विकास संचालक यांनी याविषयी टिप्पणी दिली आहे “आमची आंतरराष्ट्रीय अकादमी भागीदारी हि प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या विकासामध्ये सामायिक मूल्यावर आधारित आहे. ठाणे शहरात या कार्यक्रमाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे आणि येत्या काही वर्षांत त्यांच्या कोचिंग टीम आणि ठाणे एफसी टिमसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला वसलेले हे शहर मुंबई महानगर प्रदेश शहराच्या जवळचे आणि मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. या करारामुळे ठाणे शहराच्या फुटबॉल विकासात निश्चितच फायदा होईल व याचे येत्या काळात चांगले परिणाम पाहायला मिळतील.