Amazon, Meta, Google आणि HP सारख्या टेक कंपन्यांमध्ये एकाच वेळी नोकर कपात का होत आहे?

जागतिक मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे. पण तज्ञांच्या मते ही केवळ सुरूवात आहे. येत्या काही आठवड्यात ही टेक कंपन्यांमधील नोकर कपात वाढत जाण्याची शक्यता आहे. टेक कंपन्यांची गेल्या काही आठवड्यांपासून कमाई घटल्यामुळे त्याचा परिणाम आता ह्या नोकरकपातीच्या स्वरूपात दिसत आहे. अॅमेझॉन (Amazon), मेटा (Meta), गुगल (Google), ट्विटरनंतर (Twitter) आता आणखी एका आयटी कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. एचपी कम्प्युटर्स (HP Computers) आणि प्रिंटर्स (HP Printers) ही कंपनी तब्बल चार ते सहा हजार नोकरदारांना एकावेळेस काढून टाकणार आहे. तरी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असुन एका पाठोपाठ एक बेरोजगारीचं संकट सध्या आयटी क्षेत्रात बघायला मिळत आहे.

Columbia Business Schoolचे Associate Professor Dan Wang यांनी मांडलेल्या मताच्या आधारे, येत्या काही आठवड्यात आणि महिन्यांत, त्या कंपन्या त्यांच्या खर्चात कपात करण्याचा विचार करत आहेत. Wang यांच्या माहितीनुसार, जेव्हा ते खर्च कमी करतात, तेव्हा सर्वप्रथम साधारणत: लेबर कॉस्ट, जाहिरात आणि मार्केटिंगचा खर्च कमी करण्यावर विचार करतात. जेव्हा ते आकडेवारी पाहत असतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींचा ट्रेंड कसा आहे हे पाहत असतात. जेव्हा हे चित्रं अपेक्षेप्रमाणं नसतं तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कामगारांची संख्या कमी-जास्त करावी लागते.

याबाबत Menlo Ventures partner Matt Murphy असं सांगतात की काही कंपन्या मोठ्या प्रमाणात लोकांना कामावरून काढून टाकण्या ऐवजी नव्या नियुक्त्या कमी करतात. जेव्हा तोट्यातून तिसर्‍या तिमाही मधून बाहेर पडणं हे दुसर्‍या तिमाही पेक्षा कठीण होतं तेव्हा आपल्याकडे किती लोकं काम करत आहेत याचा विचार केला जातो. आता आपण अजून जास्त लोकं सामावून घेऊ शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर प्रत्यक्षात लोकांना कामावरून काढून टाकावे लागते.

Amazon, Meta आणि Google ची आर्थिक वर्ष 2022 च्या शेवटी किंवा 2023 च्या सुरूवातीला संपतात. ते आता त्यांच्या त्यांची आर्थिक वर्षे पूर्ण होण्यापूर्वी बॅलन्सशीट काढू पाहत असतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचार्‍याला आता कामावरून काढून टाकले असेल आणि त्याला सहा आठवड्यांचा सर्व्हंस दिला गेला असेल, तर पहिल्या तिमाहीसाठी खर्च कमी होतो. जरी कामगारांना तीन महिन्यांप्रमाणे जास्त काळ सर्व्हंस दिले गेले तरी, त्यांचे पगार पहिल्या तिमाहीच्या समाप्तीपूर्वीच बंद होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.