कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय?

कर भरताना चूकभूल झाल्यास चौकशी होणार नाही, काय आहे हा निर्णय?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना
दरवर्षी नियमितपणे न चुकता कर भरणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा केली आहे. कर भरताना करदात्यांकडून घाईगडबडीत होणाऱ्या चूकभूल दुरुस्तीमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर रिटर्न भरताना करदात्यांकडून एखादी चूक झाली, तर यापूर्वी त्यांची चौकशी करण्यात येत होती. यामुळे प्रामाणिकपणे कर भरणारे करदाते वैतागले होते. एकीकडे प्रामाणिकपणे कर भरायचा. त्यात थोडीशी चूक झाली तर चौकशीचा फेरा मागे लागायचा. आता मात्र सरकाराने नियमित कर भरणाऱ्या सामान्य करदात्यांवर पूर्ण विश्वास ठेवत अशी चूक झाली तरी त्यांची चौकशी होणार नाही असा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता करदात्यांना गेल्या दोन वर्षांतील चुकांची सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. करदात्यांना चक्क अपडेटेड रिटर्न भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या दिवशी पुढील 2 वर्षांपर्यंत अपडेटेड रिटर्न करदाते भरू शकतात. म्हणजेच 2021-22 ला रिटर्न भरले. त्यात काही बदल करायचा असल्यास त्यासाठी 2022-23 पर्यंत अपडेटेड रिटर्न भरता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.