Tata Nexon ठरली भारतातील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट SUV
Tata Nexon ठरली भारतातील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट SUV
मुंबई : सप्टेंबर 2021 मधील बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे टाटा मोटर्सची Tata Nexon हि गाडी. टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात 9,211 युनिट्स Nexon विकल्या केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 53.34 टक्के वाढ झाली आहे. तर मारुती सुझुकी विटारा ब्रेझा 7 व्या स्थानावर घसरली आहे. सप्टेंबर महिन्यात मारुतीने विटारा ब्रेझाची 1,847 युनिट्सची विक्री केली आहे. या कालावधीत एकूण उत्पादनात सुमारे 60 टक्के घट झाली आहे. दरम्यान, Nexon कॉम्पॅक्ट एसयूव्हीप्रमाणे Nexon EV ला देखील ग्राहकांडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने Nexon EV च्या 1,022 युनिट्सची विक्री केली आहे.
दरम्यान, ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवणारी टाटाची ही भारतातील पहिली कार आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच टाटाच्या टिगॉर आणि टियागोला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.