टाटा मोटर्सने रचला इतिहास, एका वर्षात मिळवले सर्वाधिक पेटंट
नाविन्यपूर्ण कल्पना व नवीन उपक्रमांमध्ये 125 पेटंट मिळवत रचला
टाटा मोटर्सने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी 125 पेटंट दाखल केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेटंट दाखल करण्याचा हा कंपनीच्या इतिहासातील हा सर्वोच्च आकडा आहे. कंपनीने अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन संकल्पना व उपक्रमांसाठी आखलेल्या आपल्या मोहिमेला गती दिली आहे, असेही कंपनीने म्हंटले आहे. दाखल केलेल्या पेटंटमध्ये पारंपारिक आणि नवीन ऊर्जा पॉवरट्रेन तंत्रज्ञान, सुरक्षा, कनेक्टेड वाहन तंत्रज्ञान, बॉडी इन व्हाइट (BIW) आणि ट्रिम्स आणि इतर वाहन प्रणालींमध्ये विविध प्रकारच्या नवकल्पनांचा आणि विकास या गोष्टींचा समावेश आहे. याच कालावधीत कंपनीचे आणखी 56 पेटंट देखील मंजूर करण्यात आले आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की अग्रगण्य तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सोल्यूशन्सच्या समृद्ध इतिहासासह, टाटा मोटर्स भविष्यात गतिशीलता सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करून नवीन युगातील तंत्रज्ञानामध्ये सातत्याने इतरांच्या तुलनेत फार पुढे जाऊन (अहेड-ऑफ-द-कर्व्ह) गुंतवणूक करत आहे. Research & Development मधील त्याची आंतरिक क्षमता, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक आणि प्रवासी दोन्ही वाहनांमध्ये सेगमेंट-परिभाषित वाहने विकसित करण्यात यश यामुळे त्यांच्या वाहनांमध्ये अनेक वर्षांनंतर अनेक नवीन कल्पनांचा वापर दिसत आहे. या नवकल्पना ग्राहकांद्वारे पसंत केले गेल्याने बाजार समभाग सुधारले आणि तेव्हापासून ते इंडस्ट्री बेंचमार्क बनले आहेत. “आम्ही नवीन ऊर्जा उपाय, सुरक्षितता, उत्पादनाची कार्यक्षमता, किंमत आणि डिजिटलायझेशन या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह नवीन बेंचमार्क स्थापित करण्याचा वारसा प्रस्थापित केला आहे,” असे टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि CTO राजेंद्र पेटकर यांनी यावेळी सांगितले.