५ लाखाखालील स्वस्त टाटाच्या या फॅमिली कारवर मिळतेय बक्कळ सूट, २३ किमीच मिळतय मायलेज!
वैशिष्ट्ये:
टाटाच्या स्वस्त कारवर मोठी सूट
टाटा टियागो वर २८ हजारांची सूट
३१ जानेवारी २०२२ पर्यंत सूट मिळेल
वर्षाच्या पहिल्याच महिन्यात टाटा मोटर्स आपल्या गाड्यांवर मोठा डिस्काउंट ऑफर्स देत आहे. जर तुम्हाला या महिन्यात टाटाची स्वस्त कार खरेदी करायची असेल तर तुमची मोठी बचत होऊ शकते. जानेवारी महिन्यात कंपनी आपली सर्वात स्वस्त कार टाटा टियागो वर मोठी सूट देत आहे. कंपनीकडून या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही मॉडलवर ऑफर्स दिली जात आहे. भारतीय बाजारात टाटा टियागो आपल्या सेगमेंट मध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट आणि मारुती सुझुकी वेगनआर सारख्या बेस्ट सेलिंग कारशी टक्कर देतेय.
टाटा टियागो वर काय आहे ऑफर
टाटा मोटर्स वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आपल्या टाटा टियागोवर एकूण २८ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. कंपनीकडून याच्या पेट्रोल मॉडलवर १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. तर जुन्या कारववर एक्सचेंज ऑफर म्हणून १५ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय, या कारच्या खरेदीवर कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपयाची अतिरिक्त बचत करता येऊ शकते. याच्या सीएमजी मॉडलवर २८ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
टाटा टियागो: परफॉर्मेंस
टाटा टियागो मध्ये १.२ लीटरचे ३ सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. याचे ११९९ सीसीचे इंजिन ६००० आरपीएमवर ८६ पीएसचे मॅक्सिमम पॉवर आणि ३३०० आरपीएमवर ११३ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. यात ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स स्टँडर्ड सोबत ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन देते.
इंधन टाकी आणि मायलेज
टाटा टियागो मध्ये ३५ लीटरचे इंधन टाकी मिळते. दाव्यानुसार, यात ग्राहकांना १९ ते २३ किमी पर्यंत प्रति लीटरचे मायलेज मिळते.
ब्रेकिंग आणि सस्पेंशन
टाटा टियागोच्या फ्रंट डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक मिळते. सस्पेंशन फीचर्समध्ये फ्रंट मध्ये McPherson Strut आणि रियर मध्ये क्वाइल स्प्रिंग सोबत हायड्रॉलिक शॉक अब्जॉर्बर दिले आहे.
किंमत
टाटा टियागोची दिल्लीमधे एक्स शोरूम किंमत ४.९९ लाख रुपये आहे. टॉप एन्ड मोडेलची किंमत ६.५ लाख रुपयांपर्यंत आहे.येणाऱ्या काळात भारतीय बाजारेठेत टाटा सर्वांना कमी किमतीमधे सुरक्षित वाहन देऊन टक्कर देणार आहे