गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनाविषयी सत्यजित तांबेंचे आदित्य ठाकरेंना पत्र!
गडकिल्ले आणि पर्यावरण संवर्धनाविषयी सत्यजित तांबेंचे आदित्य ठाकरेंना पत्र!
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे गडकिल्ले आणि पर्यावरणाला होत असलेला धोका टाळण्यासाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात तांबे यांनी “अलिकडच्या काळात पर्यटन क्षेत्राला मिळालेली चालना ही तशी समाधानाची बाब असली, तरी याची दुसरी नकारात्मक बाजूही समोर येत आहे. पर्यटकांच्या संख्येने ओलांडलेल्या मर्यादिमुळे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर कचऱ्याचे प्रमाण तर वाढतच आहे, शिवाय तेथील वास्तू व जैवविविधतेवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. तसेच काही पर्यटकांच्या बेशिस्त वर्तनामुळे ऐतिहासिक गोष्टींचेही नुकसान होत आहे” असे मत व्यक्त केले आहे.
या सर्वांवर उपाय म्हणून पर्यावरणप्रेमी व गिर्यारोहक संस्थांकडून कंट्रोल टुरीझम’ची मागणी पुढे आली आहे. पर्यावरण व गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने ‘कंट्रोल टुरिझम किंवा तत्सम उपाययोजनांची पर्यावरण मंत्र्यांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे.