सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’
सोलापुरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ साठी कोचिंग डेपो बांधण्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा डेपो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे.