Swara Bhaskar : “नशा उतर गया?”; महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) एक परखड अभिनेत्री. मुद्दा राजकीय असो वा सामाजिक स्वरा बोलायला घाबरत नाही. अनेकदा यामुळे तिला ट्रोलही व्हावं लागतं. पण स्वरा बोलायची थांबत नाही. काही तासांपूर्वी स्वराने महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट केलं आणि या ट्वीटनंतर स्वरा ट्रोल झाली. ट्वीटमध्ये हॅशटॅग देताना स्वराने पुण्यतिथीऐवजी जयंती असा उल्लेख केला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. चूक लक्षात येताच स्वराने ती सुधारली, पण तोपर्यंत जुन्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

“गाँधी हम शर्मिन्दा हैं, तेरे क़ातिल ज़िंदा हैं।” असं ट्वीट तिने केलं. ११ वाजून ३६ मिनिटांला केलेल्या ट्वीटला हॅशटॅग देताना तिने गांधीपुण्यतिथीऐवजी गांधीजयंती असं लिहिलं. काही मिनिटांतच तिला तिची चूक लक्षात आली.  तिने लगेच ते ट्वीट डिलिट केलं आणि नव्या ट्वीटमध्ये चूक सुधारली. मात्र तोपर्यंत जुन्या ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. हा स्क्रिनशॉट शेअर करत अनेकांनी स्वराला फैलावर घेतलं.

“तुझी नशा उतरली का?” असा प्रश्न एका युजरने तिला केला. “पुण्यतिथीला जयंती म्हणून तूच तर गांधींना मारलंस” अशी कमेंट एका युजरने केली.  “आधी जयंती साजरी आणि आता पुण्यतिथी… बापू….,” अशा शब्दांत एका युजरने स्वराला ट्रोल केलं. “जयंतीचा अर्थ माहित करून घ्यायचा दीदी”, असा सल्ला एका युजरने तिला दिला. “लहान मुलांना पण जयंती आणि पुण्यतिथीमधील फरक माहित असतो, तुझ्याकडून इतकी मोठी चूक”, अशी कमेंट एका युजरने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.