पुणे: पुणे लोकसभेचे भाजप व महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ औंध परिसरातील इंदिरा-कस्तुरबा वसाहतीमध्ये युवा उद्योजक व माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने ‘हर घर चलो अभियान राबविण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन सनी यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले हे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी व जगात देशाचे स्थान बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोहोळ यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी नागरिकांशी बोलताना सनी निम्हण म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचा डंका वाजवला आहे. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. देशाचा सर्वांगीण विकास होत आहे. आपल्या पुण्यात मेट्रो झाली, रस्त्यांची कामे झाली. यातून वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. सबका साथ सबका साथ ही ब्रीद घेऊन यंदा आपल्याला मोदींसाठी 400 पार खासदार निवडून द्यायचे आहेत त्यासाठी पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना निवडून द्या असे ही ते म्हणाले.
सुकन्या समृद्धी कार्डचे २३२८ जणांना वाटप
सनी निम्हण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहरात सनीज सुपर वीकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आधार नोंदणी व सुकन्या समृद्धी कार्ड नोंदणी अभियान देखील राबविण्यात आले होते. यामध्ये शहरातील २०२८ महिलांनी सुकन्या समृद्धी कार्डची नोंदणी केली होती. सनी निम्हण यांनी औंध परिसरातील इंदिरा- कस्तुरबा वसाहतीमधील महिलांच्या घरोघरी जाऊन सुकन्या समृद्धी कार्डचे वाटप केले. यावेळी महिला वर्गाचा मोठा उत्साह दिसून आला. मोठ्या प्रेमाने त्यांनी सनीदादांचे स्वागत करत औक्षण केले. सनी दादा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या माणूस असल्याची भावना यावेळी महिला वर्गाने बोलून दाखवली.