पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? बोम्मईंनी राजीनामा द्यावा – खा. अरविंद सावंत

पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?
बोम्मईंनी राजीनामा द्यावा – खा. अरविंद सावंत

कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप वर टीका केली आहे. या पुतळा विटंबना प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा.अरविंद सावंत यांनी केली आहे.

कर्नाटकमधील पुतळा विंटबना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा सवाल खा. सावंत यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. भाजपला थोडी तरी लाज असेल तर मुख्यमंत्री राजीनामे देतील. या घटनेचे दिल्लीत आणि महाराष्ट्रातही पडसाद दिसतील असा इशारा सावंत यांनी दिला आहे. शिवसेना खासदार याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.