धमकी प्रकरणानंतर सिकंदर शेखची प्रतिक्रिया!

महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपून ४८ तास उलटले आहेत. मात्र या स्पर्धेवर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. माती भागात महेंद्र गायकवाडने उपांत्य फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. (Sikander Sheikh first reaction after the threat incident)सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होता. मात्र यावेळी पंचांच्या निर्णयावर टीका होत आहे. महाराष्ट्र केसरीत सिकंदर शेख विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणावर सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली आहे.

 

सिकंदर शेख म्हणाला, “कुस्तीमध्ये परफेक्ट डांग बसली नाही. तेव्हा मी एका खांद्यावर पडलो. तिथे त्याला २ गुण द्यायला पाहीजे होते. कारण त्याची अ‍ॅक्शन होती. मला १ गुण द्यायला पाहीजे होता. अशी ४-३ ने कुस्ती चालायला पाहीजे होती. मात्र पंचांनी २ गुण द्यायच्या ऐवजी ४ गुण दिले.”

 

योग्य डांग म्हणजे काय-“डांग परफेक्ट हवी. पूर्ण चार गुण हवे असतील तर प्रतिस्पर्धी पाठीवर पडायला हवा. किंवा पूर्ण वरुन आलेलो पाहीजे. तेव्हा ४ गुणांची अ‍ॅक्शन होते. माझा कब्जा असून सुद्धा महेंद्र गायकवाडला ४ गुण देण्यात आले. हे चुकीचे झाले आहे,” अशी खंत सिकंदर शेख याने व्यक्त केली.

 

माझ्या कोचने देखील या प्रकरणी दाद मागितली. तेव्हा त्यांना तिथे काही बोलू दिले नाही. माघारी हाकलण्यात आले. चॅलेंज सक्सेस झाल्याचे सांगितले. फक्त फ्रंट साईटचा व्हिडीओ दाखवला, बॅक साईटचा का दाखवला नाही, असा प्रश्न सिकंदरने उपस्थित केला.

 

धमकीप्रकरणावर सिकंदर शेख म्हणाला, “संग्राम कांबळे आमच्या तालमीतील पैलवान आहेत. संग्राम कांबळे तालमीचे फेसबूक पेज चालवतात. त्यांना वाईट दिसलं म्हणून ते बोलले. ते काही चुकीचे बोलले नाहीत आहेत. ते काय बोलले मला माहित आहे. ती रेकॉर्डींगही व्हायरल झाली आहे. धमकीचा कोणताही विषय झाला नाही. फक्त निर्यण का चुकीचा दिला म्हणून विचारले.त्यामधे धमकीचा कोणताही विषय नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.