‘जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश द्या,’ ओडिसा राज्यपालांच्या मागणीवर राजकारण पेटण्याची शक्यता

ओडिसा राज्याचे राज्यपाल गणेशी लाल यांनी जगन्नाथ मंदिरात परदेशी भाविकांना प्रवेश देण्यावर विचार करायला हवा, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता येथे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गणेशी लाला यांच्या या भूमिकेला याअगोदरच भाजपा, काँग्रेस या विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. ओडिसामध्ये जगन्नाथ मंदिराला महत्त्वाचे स्थान आहे. जगन्नाथ मंदिर हे चार धामपैकी एक आहे

 

राज्यपाल गणेशी लाल काय म्हणाले?

 

राज्यापाल गणेशी लाल गुरुवारी भुवेश्वरमधील उत्कल विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राजघराण्याचे वंशज गजपती दिब्यासिंह डेब, पुरी गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी परदेशी भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यावर विचार करावा, असे आवाहन केले आहे. “परदेशी नागरिक गजपती, मंदिरातील सेवक, जगतगुरु शंकराचार्य यांची भेट घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासही परवानगी काय हरकत आहे. माझे हे वैयक्तिक मत आहे. लोक याचे स्वागत करतील की नाही, याची मला कल्पना नाही,” असे राज्यपाल गणेशी लाल म्हणाले.

 

जगन्नाथ मंदिर हे चार धामपैकी धाम आहे. त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र या मंदिरात फक्त हिंदू धर्मीय भक्तांनाच प्रवेश दिला जातो. तशा आशयाचे फलक या मंदिर परिसरात लावलेले आहेत. मंदिरातील सेवकांनी राज्यपालांची सूचना फेटाळलेली आहे. तसेच गणेशी लाल यांच्या भूमिकेपासून भाजपानेही अंतर राखले असून ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने देखील ही सूचना अमान्य असल्याचे मत मांडले आहे. याच कारणामुळे ओडिसाच्या राज्यपालांच्या विधानामुळे राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.