शिवाजी पार्कचे स्मशानभूमीत रूपांतर करू नका – प्रकाश आंबेडकर
शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक बांधण्याच्या भाजपच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे ते मैदानच राहिले पाहिजे. शिवाजी पार्कचे स्मशानभूमीत रूपांतर करू नका, असे आंबेडकर म्हणाले. स्मारकासाठी इतर कोणतीही जागा निवडली जाऊ शकते. आंबेडकर म्हणाले की, शिवाजी पार्क हे क्रीडांगण आहे. त्यामुळे त्याचा वापर खेळासाठी केला पाहिजे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, अभिनेता शाहरुख खानने मुस्लिम धर्माचे पालन केले आहे. याचा विचार करून वाद मिटवावा. आंबेडकर म्हणाले की, मी मुस्लिम समाजातील लोकांच्या अंतिम संस्काराला जातो. तिथं मी पाहिलं आहे की त्यांची नमाज पठण केल्यानंतर काही लोकं फुंकर मारतात.