बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ? ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीका

ममता बॅनर्जी यांच्या बैठकांवरून भाजपची महाविकास आघाडीवर टीका, बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ? – आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी काल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व खा.संजय राऊत राऊत यांची भेट घेतली. यादरम्यान काही उद्योगपतींची देखील ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली.

याभेटींच्या बातम्या सध्या सगळीकडे चर्चेत आहेत यातच आज ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय राजकारण आणि भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासंदर्भात चर्चा झाली.

याभेटींवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

महाराष्‍ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्‍ट्रातील तरूणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय? मुंबईकर टाटांचा ज्‍यांनी अपमान केला त्‍यांना शिवसेना महाराष्‍ट्रात पायघड्या घालते आणि आम्‍हाला मग महाराष्‍ट्र धर्म तुम्‍ही शिकवता? बांग्लादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय ? असे सवाल विचारत शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

या भेटींमधील चर्चा सरकारने जाहीर करावी. सरकार या भेटींमधील चर्चा का लपवत आहे? असेही शेलार यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.