शरद पवारांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना फोन; म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील काही प्रतिनिधी आणि मी..”

शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावत संवाद साधला.

स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आज माझ्याकडे काही प्रश्न घेऊन आले आहेत. माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली असून, या प्रश्नावर लवकर बैठक झाली पाहिजे. त्यावर सर्वांनी सामोपचाराने प्रश्न मार्गी लागला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील काही प्रतिनिधी आणि मी, तसेच तुमच्याकडील काही लोक अशी एकत्रित बैठक आपण सह्याद्रीवर घेऊया. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हो साहेब तुमची तब्येत कशी आहे. त्यावर शरद पवार म्हणाले ठीक आहे, अशा प्रकारे दोघांमध्ये संवाद झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.