मन्नत बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटला शाहरुख, पण तरीही हात जोडून का मागितली माफी?

शाहरुख खान हे नाव आणि त्याचं वलय काय आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. त्याच्या ‘पठाण’ सिनेमाबाबत बराच गदारोळ झाला असला तरी शाहरुखच्या चाहत्यांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. काही ठिकाणी शाहरुखचे पुतळे जाळले गेले असले तरी किंग खान आजही कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात राज करतो. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत शाहरुखसाठीचं वेड पाहायला मिळतं.

शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवसाला, अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’ बाहेरमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी होते. मात्र यावेळी २२ जानेवारीलाही अगदी तसंच दृश्य पाहायला मिळालं. शाहरुखला त्याच्या ‘पठाण’ सिनेमाच्या प्रदर्शनाआधी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’च्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी केली होती.

शाहरुखनेही चाहत्यांना निराश केलं नाही. तो ‘मन्नत’ च्या टेरेसवर आला आणि त्याने खास शैलीत चाहत्यांच्या अफाट प्रेमाबद्दल आभार मानले. शाहरुखला पाहताच जमावाने जल्लोष केला आणि सर्वांनी शिट्ट्या वाजवून ‘शाहरुख खान’ असा जयघोष सुरू केला. चाहत्यांचे हे नित्सिम प्रेम पाहून बादशाहनेदेखील विनम्रतेने हात जोडले. मात्र चाहत्यांमुळे झालेल्या गर्दीमुळे बराच काळ वाहतुक ठप्प झाली होती. याबद्दल शाहरुखने सोशल मीडियावर गैरसोय झालेल्यांची आणि वाहतूक व्यवस्थापकांची माफी मागितली.

शाहरुखने त्याच्या ट्विटर हँडलवर चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला आहे. एकत्र लिहिले आहे, ‘या अद्भुत रविवारच्या संध्याकाळबद्दल धन्यवाद. क्षमस्व, पण मला आशा आहे की लाल कारच्या प्रवाशांनी त्यांचे सीट बेल्ट घातले होते. ‘पठाण’साठी तुमची तिकिटे बुक करा आणि मी तुम्हाला पुढच्या वेळी तिथे भेटेन.

ट्वीटसोबत शाहरुखने ‘पठाण’साठी तिकीट बुक करण्याची लिंकही शेअर केली. दरम्यान, शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता असली तरी या सिनेमावरील वाद अजूनही थांबलेला नाही. अलीकडेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना ‘पठाण’वरून सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारला असता त्यांनी शाहरुख खानला ओळखण्यास नकार दिला. पण नंतर शाहरुखने रात्री २ वाजता फोन केल्याचं सांगितलं. दुसरीकडे ‘पठाण’बाबत देशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पाटणा येथे श्रीराम सेना संघटनेने ‘पठाण’ विरोधात निदर्शने केली आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.