शाहरुख खानने मध्यरात्री २ वाजता केला मुख्यमंत्र्यांना फोन; असं नेमकं घडलं तरी काय?
- Shahrukh Khan लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने रात्री २ वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्याच्या ‘पठाण’ चित्रपटावरून सध्या बराच वाद सुरू आहे. मात्र असं काय घडलं ज्यामुळे शाहरुखने त्यांना फोन केला.
– लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खान याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे बराच वाद सुरू आहे. या चित्रपटातील गाणं ‘बेशरम रंग’ ला सोशल मीडियावर विरोध झाला त्यानंतर भाजप नेत्यांनी गाण्याला विरोध करत गाण्यातील बिकीनीचा रंग बदलण्याची मागणी केली. मात्र असं काहीतरी घडलंय ज्यामुळे शाहरुखला आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटनुसार, शाहरुखने त्यांना रात्री २ वाजता फोन केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘पठाण’ ला सुरक्षा देण्याची हमी दिली. परंतु, शाहरुखला मुख्यमंत्र्यांना रात्री फोन का करावा लागला? याचं उत्तर आहे ‘पठाण’ चित्रपट.
नुकतंच आसाम राज्यात ‘पठाण’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. मात्र त्यादरम्यान चित्रपट दाखवणाऱ्या थिएटरची तोडफोड करण्यात आली. याबद्दल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी कोण शाहरुख खान? मी नाही ओळखत पठाणला आणि अशा कुणालाही असं वक्तव्य केलं. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी ट्विटरवर टीकेची झोड उठवली. दुसऱ्याचं दिवशी मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत शाहरुखने आपल्याला फोन केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री ट्वीट करत म्हणाले, ‘बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांनी मला रात्री उशिरा २ वाजता फोन केला होता. त्यांनी गुवाहाटीमध्ये ‘पठाण’च्या स्क्रीनिंग दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मी त्यांना आश्वासन दिलंय की ही राज्य सरकारची ड्युटी आहे की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील. आम्ही अशा घटना परत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करू.’
याआधी पत्रकारांना उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मी शाहरुखला नाही ओळखत असं म्हटलं होतं. आसामच्या जनतेने हिंदी नाही तर आसामी चित्रपटांची काळजी केली पाहिजे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर नेटकऱ्यांनी ‘कोण शाहरुख खान’ असा ट्रेण्ड चालवला होता. आता शाहरुखच्या फोननंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ‘पठाण’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.