ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहात साजरा केला स्वातंत्र्यदिन…

कात्रज, १५ ऑगस्ट – देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा होत असतांना पुना जेरियॅट्रीक केअर सेंटरमधील ज्येष्ठ नागरिकांनीही ध्वजवंदन करून यात सहभाग घेतला. सेंटरमधील ज्येष्ठ सदस्य आणि१५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्म झालेल्या विनायक रोटीथोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वातंत्र्यदिन चिरायु होवोच्या घोषणा देत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी स्वरचित कवीता आणि चारोळ्या सादर केल्या. काही ज्येष्ठांनी त्यांच्या बालपणीच्या घटना आणि प्रसंगांना उजाळा दिला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजराकरीत असतांना त्यांनी रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव कसा साजरा केला होता त्याच्या आठवणी जागवल्या.

यावेळी चंद्रशेखर ऐनापुरे यांनी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. हिंदी सिनेमातील गाजलेली देशभक्ती गीते त्यांनी गायली. ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. संतोष कनशेट्टे, सदस्या दिपाली कनशेट्टे, सामाजिक कार्यकर्ते प्रेम कड, धनाजी यादव आणि अश्विनी गावंडे हेही सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.