विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींनी काढली अभिनेता सुशांतसिंग राजपूत ची आठवण

२८ फेब्रुवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक ट्रेंड पाहायला मिळाला. Science Lover Sushant हा ट्रेंड ट्विटरवर आज ट्रेंडिंगला होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा बॉलिवूडमध्ये एक आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्यामध्ये विविध विषयांमध्ये सखोल ज्ञान मिळवण्याची एक चिकित्सक वृत्ती अनेकदा पाहायला मिळाली। त्याला त्याने निवडलेल्या क्षेत्राच्या बाहेर अनेक विषयांत स्वारस्य होते. “तो एक विज्ञानप्रेमी होता,” सोशल मीडियावर, सुशांत सिंग राजपूत साधारणपणे कमी शब्दांत व्यक्त होणारा माणूस होता; त्याने आपल्या काही आवडी निवडी काही निवडक विषयांसाठी राखून ठेवल्या होत्या. त्यापैकी विज्ञान हा एक विषय त्याचबरोबर खगोल भौतिकशास्त्र हा ही विषय त्याची आवड होता. त्याचा इंस्टाग्राम बायो काहीसा त्याच अंदाजाचा होता “फोटोन इन अ डबल स्लिट.” अशा शब्दांत त्याने बायो लिहिला होता. सुशांत ने त्याचा बराच वेळ आकाशातील तारे पाहण्यात घालवला; अभियांत्रिकी क्षेत्रातील हा विद्यार्थी अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो अवकाश विश्वाच्या बाबतीत अभ्यासू होता.

सुशांत सिंग राजपूतने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या विज्ञानाशी संबंधित अनेक पोस्ट आहेत. त्याचे मथळे त्याला जाणवत असलेल्या उत्कटतेचे पुरेसे संकेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विज्ञाननिष्ठ सुशांतसिंग राजपूत ची आठवण विज्ञान प्रेमींनी काढली आणि Science Lover Sushant हा ट्रेंड हिट झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.