नव्या जबाबदारीसाठी सत्यजित तांबे झाले सज्ज!
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या (Maharashtra Youth Congress) अध्यक्ष पदाच्या निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सर्वात जास्त मतं मिळालेले कुणाल राऊत यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदासाठी संधी मिळाली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसला आता नवीन अध्यक्ष मिळाल्याने आता मावळते अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या नाविन्यपूर्ण आणि भरदार कारकिर्दीला विराम मिळाला आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कुणाल राऊत तर उपाध्यक्षपदी शिवराज मोरे व शरण पाटील यांची आज निवड करण्यात आली आहे. या नवीन नियुक्त युवा नेत्यांचे सत्यजित तांबे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच “आज अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या माझ्या कारकिर्दीला विराम मिळतोय. पण “हम थकेंगे नहीं और रुकेंगे भी नहीं” पक्ष जी जबाबदारी देईल की आनंदाने स्विकारेल !” अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी नवीन जबाबदारी साठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.