महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांचं काम दिसतंय, बोलतंय आणि जनतेपर्यंत पोहचतय !
सत्यजीत तांबे यांची विधिमंडळात लक्षवेधी कामगिरी !
राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पूर्ण झाले. या अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे हे विशेष चर्चेत आणि प्रकाशझोतात राहिले. त्याला कारण म्हणजे त्यांनी अधिवेशनात मांडलेले युवकांचे, शिक्षकांचे, महिला-भगिनींचे, आदिवासींचे, जेष्ठांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विविध प्रश्नांबाबत केलेली अभ्यासपूर्ण चर्चा.
५ जिल्हे ५४ तालुके, ४००० पेक्षाही जास्त गावांचा समावेश असणारा मतदारसंघ सांभाळणं ही काही साधी गोष्ट नाही. तरी हा माणूस सातत्याने मतदारसंघाच्या दौऱ्यांच्या माध्यमातून, रविवारी त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीगाठींच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधत असतात. त्यांनी ठेवलेल्या जनसंपर्कामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळतो.
एवढंच नाही तर विधिमंडळात त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण चर्चांना, मांडलेल्या प्रश्नांना जनता दाद देत आहे. एक जेष्ठ महिला विधीमंडळात सत्यजीत तांबे यांनी उठवलेला आवाज ऐकतानाचा हा फोटो अत्यंत बोलका आहे…!