मास्टर ब्लास्टरच्या कन्येची पहिलीच जाहिरात होतेय व्हायरल !
सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या लुक्स आणि चित्रपट सृष्टीतील व्यक्तींसोबत जवळीक पाहून ती अभिनयाकडे वळणार का अशा नेहमीच चर्चा ऐकायला येत असतात. सारा तेंडुलकरने जाहिरातीद्वारे ग्लॅमरस दुनियेत आपले पदार्पण केले आहे.
आंतरराष्ट्रीय कपड्यांचा ब्रँड Ajio luxe साठीची सारा तेंडुलकरने केलेली जाहिरात सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. या जाहिरात व्हिडिओमध्ये सारा वेगवेगळ्या लुक्स आणि पोजेस मध्ये दिसत आहे. २४ वर्षाच्या साराच्या या जाहिरातीमध्ये बनिता संधू व तानिया श्रॉफ पण आहेत .साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध छायचित्रे शेअर केलेली पाहायला मिळत आहेत. सारा तेंडुलकरचे हे नवे अंदाच चाहत्यांच्या चांगलेच पसंती पडत आहेत. जाहिरातीत ती तळ्याच्या काठावर उभी असल्याचे दिसत आहे. तिथे साराच्या वेगवेगळ्या पोजेस पहायला मिळतायेत.
सोशल मीडियावर साराने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर कमेंटसचा वर्षाव होत आहे. काहींच्या कमेंट्स मध्ये ती हॉलीवूडच्या अभिनेत्रीसारखी दिसत असल्याचं म्हंटल जातय तर काहींमध्ये ती ग्रीसची रहिवासी दिसत आहे असेही म्हटले जात आहे.
सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची दोन्ही मुले चांगली कामगिरी करतआहेत. त्यांचा लहान मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या क्रिकेट मध्ये आपले नाव कमवत आहे.आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसतोय. साराने आपले शालेय शिक्षण मुंबईत करून पुढील शिक्षण लंडनमध्ये मेडिसीनमधील पदवी घेतली आहे. साराच्या ग्लॅमरस दुनियेत साराचे सर्वांकडून स्वागत होत आहे.