सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनाही सलमान खानची नवी स्टाईल आवडली आहे. ‘अंतिम’ च्या प्रमोशनसाठी सलमान खान सध्या अहमदाबादमध्ये आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली. या आश्रमात सलमानने चरखा ही फिरवला. सलमान खान चा महात्मा गांधी यांच्या आश्रमातील हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंतिम’ ने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 5.03 कोटी रुपये, शनिवारी 6.03 कोटी रुपये आणि रविवारी 7.55 कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे, या चित्रपटाने तीनमध्ये एकूण 18.61 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सलमान खान अजूनही या चित्रपटाचे सातत्याने प्रमोशन करत आहे. या चित्रपटाचे फायनल बजेट 35 कोटी इतके सांगितले जात आहे, अशा परिस्थितीत चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप मेहनत करावी लागणार आहे.