“त्या” कुटुंबियांचे सलील देशमुखांकडून सांत्वन
शनिवारी वीज पडून नरखेड तालुक्यातील हिवरमठ येथे योगेश पाठे तर पेठ मुक्तापुर येथील दिनेश कामडी व बाबाराव इंगळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान रविवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी या दोन्ही गावामध्ये जाऊन पाठे, कामडी व इंगळे कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाच्या माध्यमातून लवकरच या तिन्ही कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सलील देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सलील देशमुख यांच्यासोबत यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उभंरकर, तहसीलदार बि.डी.जाधव, जलालखेडयाचे ठाणेदार मनोज चौधरी, खंड विकास अधिकारी निलेश वानखेडे, सभापती निलिमा रेवतकर, जि.प.सदस्य प्रितम कौरे, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, मयुर उमरकर, वसंत चांडक, अतुल पेठे, संजय बडोदेकर, नारायण ठाकरे, नानाजी माळोदे यांच्यासह सरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला देशमुख यांनी पेठमुक्तापुर येथील इंगळे व नंतर कामडी कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेतली. घडलेली घटना अत्यंत दुदैवी असून परत अशा घटना होवू नये यासाठी काही मार्ग काढता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले.
यानंतर हिवरमठ येथील पाठे कुटुंबियांची देखील सलील देशमुख व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी भेट घेवून सांत्वन केले. हिवरमठ येथे योगेश पाठे यांचा १० दिवसापूर्वी तर दिनेश कामडी यांचा पाच महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे पाठे, कामडी व इंगळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. शेवटी अनिल देशमुख साहेबांच्या मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. या तिन्ही कुटुंबियांना लवकरच शासनाच्या माध्यमातून मदत करण्यात येईल असेही सलील देशमुख यांनी यावेळी सांगितले.