मनसे नेत्या रुपाली पाटील यांचा ‘मनसे’ सोडण्याचा निर्णय; पुणे मनसेला मोठा धक्का

पुणे | पुण्यातील मनसे नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या या निर्णयामुळे मनसेला निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वादामुळे त्या नाराज होत्या. यापूर्वीही त्यांनी एका मुलाखतीत पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते.

रुपाली पाटील या मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत या आधीच पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का बसला जात आहे.

दरम्यान, रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.