अपघातानंतर प्रथमच ऋषभ पंतची प्रतिक्रीया, म्हणाला ‘दुखापतीतून बरा होतोय पण आव्हानं…’

ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. या अपघातामधून तो बचावला खरा, पण गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता पहिल्यांदाच पंतने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. पंतने एक ट्विट केलय…

 

नवी दिल्ली : ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात डिसेंबरमध्ये झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, दैव बलवत्तर म्हणून पंत त्यामधून बचावला असे म्हटले जात आहे. गेले काही दिवस पंतवर शस्त्रक्रीया होत होत्या. तोपर्यंत पंत आपल्या चाहत्यांशी बोलू शकला नव्हता. पण आता पंतने अपघातानंतर आपली पहिली प्रतिक्रीया दिलीय.

 

पंतने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” मला तुम्हाला कळवायला आनंद होतो आहे की, माझ्यावरील शस्त्रक्रीया ही यशस्वी झाली आहे. मला काळात जे समर्थन, पाठिंबा मिळाला याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मला मिळालेल्या शुभेच्छांबाबत मी कृतज्ञ आहे. या दुखापतीमधून बरा होण्याच्या मार्गावर मी परतलो आहे. यापुेढीही माझ्यापुढे आव्हानं असतील आणि त्यांचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे. या सर्व प्रकारात बीसीसीआय आणि सचिव जय शहा यांनी मला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.”

 

ऋषभ दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतोय, या कठीण काळात मला बऱ्याच जणांनी प्रोत्साहन दिले, त्या सर्वांचा मी ऋणी राहीन. माझे सर्व सहकारी, डॉक्टर आणि फिजिओ यांचा मी आभारी आहे. मैदानात उतरण्यासाठी मी उत्सुक आहे आणि तुम्हाला मैदानावर पाहण्यासाठीही मी उत्सुक असेन.

 

ऋषभची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही आणि त्यानंतर तो दिल्लीहून आपल्या घरी निघाला. ऋषभने पहाटे हा प्रवास करायचे ठरवले आणि स्वतः घरी गाडी चालवत जायचा निर्णय घेतला. दिल्लीहून घरी जात असताना रस्त्यामध्ये त्याचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यावरर ऋषभच्या कारनेही पेट घेतला होता. त्यावेळी पंतला गाडीमधून बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांना कॉल करून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ऋषभला यावेळी गंभीर दुखापती झाल्या आहेत. अजूनही त्याला या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायला वेळ लागणार आहे. ऋषभ आयपीएल २०२३ तर खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण तो मैदानात कधी उतरणार, याची उत्सुकता आता चाहत्यांना असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.